मनोगतावर दिसणाऱ्या वाचनाच्या वेगाचा विचार करता  हा लेख तब्बल ५ दिवसांनी वाचणे म्हणजे मला भलताच उशीर लागला. पण त्यामुळे एकाच भेटीत त्यावरील उत्तमोत्तम प्रतिसादसुद्धा वाचायला मिळाले. त्यांत आता मी आणखी कसली भर घालणार? त्यातील सर्व सकारार्थी विधानांशी मी सहमत आहे आणि नकारार्थींशी असहमत, इतका  तो  सिनेमा मला आवडला होता. बैलगाडीवानाने जाड असू नये असा कांही संकेत आहे असे मला वाटत नाही.   राजकपूरला नेहमी शर्ट पँटमध्ये पहाण्याची संवय असल्यामुळे त्याला असा भय्या झालेला पाहून प्रथम जरा विचित्र वाटले. पण त्याने हे काम अप्रतिम केले असल्याचे जाणवले.