आपण लिहिलेला पहिला भाग बरोबरच आहे. पण एखादा प्रमुख पाहुणा हा कर्तृत्वाच्या नावाने बोंब आहे अशी जर आपली खात्री असेल तर त्या कार्यक्रमास जाऊन त्याचा अपमान करून कार्यक्रमाची शोभा करू नये असे वाटते.
शिवाय, हा 'मूलभूत संस्कार' फक्त भारतीय संस्कृतीत दिसुन येतो. इतर संस्कृतीत वाढलेल्यांवर तो का लादावा? त्यांनी त्यांच्या संस्कृतीतील पद्धती दुसऱ्यांवर लादल्या तर तेही बरे नाही.
इथे संस्कृतीतील पद्धत लादण्याची गोष्ट नसून When in Rome, do as Romans do. असे म्हणायचे आहे. जर ऑस्ट्रेलियात एकमेकांना धक्के मारून किंवा शिव्या देऊन आदर किंवा प्रेम व्यक्त करावे अशी तर भारतीय खेळाडूंनी तिथे गेल्यावर तसेच वागावे.