तुमचे म्हणणे बरोबरच आहे. मागच्या (बूश वि. केरी, २००४) निवडणूकीत ओहायो राज्यात बरेच गोंधळ घातले आहेत. वर मी आधीच्या प्रतिक्रीयेत म्हणल्याप्रमाणे या वर्षीही व्हर्जिनियात गडबड झाली होती.

तरी देखील आपल्याकडे, बिहार, उ.प्र. वगैरे भागात ज्या पद्धतीने गोष्टी होयच्या (आता निवडणूक आयोग बऱ्यापैकी स्वतंत्र वागतो) त्याच्याशी तुलना केल्यास अमेरिकेत चोरी होते आणि भारतात दरोडा पडतो असे म्हणावे लागेल. पूर्वी "निवडणूकीतील गडबडीवर" नलीनी सिंहचा (अरूण शौरीची बहीण) एक माहीतीपट दूरदर्शनवरच झाला होता तो पाहीला असल्यास आपल्याला मला काय म्हणायचे आहे ते समजेल.