दडपे पोहे करताना, पोहे आधी थोडेसे परतून (तेल न घालता) घेतले आणि मग केले तरी छान होतात.
घरात जर पातळ पोहे नसतील तर जाड पोहे असे कढईत किंवा उन्हात जरा गरम करुन घेतले की कुरकुरीत होतात आणि खमंग लागतात. त्यामुळे असे जाड पोह्याचे दडपे पोहे करताना आणि खातानासुद्धा (खरचं!) त्रास होत नाही.
हिरव्या मिरच्या न वापरता, भरलेल्या (मसाल्याच्या) मिरच्या तळून कुस्करून घातल्या तर त्याचीपण छान चव येते.
बघा हे प्रयोग करून !