गेले चार दिवस सि. एन. एन. वर अमेरिकेतल्या निवडणूका आणि त्यावर चर्चा पाहात होतो. तेंव्हा या बद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा झाली. खरेतर सर्कीटरावांना व्य. नी. ने विनंती करावी असे वाटत होते तेव्हड्यातच ही चर्चा दिसली. भाषकाका आणि मिलिंदरावांचे विस्तृत माहितीसाठी आभार.
अध्यक्षाचा कार्यकाळ कॉग्रेसपेक्षा आणि सिनेटपेक्षा मोठा असल्याने, आज जशी स्थिती आली आहे तशा स्थितीत अध्यक्ष काम कसा करू शकतो? त्याला प्रत्येक वेळी विरोधी पक्षापुढे नमते घ्यावे लागणार. मग त्याच्या उरलेल्या कार्यकाळाचा त्याला उपयोग काय?
--लिखाळ.