चित्तराव,
मला गेले अनेक दिवस जी शंका होती त्याच बद्दल सुरु झालेली चर्चा पाहून बरे वाटले.
'नाहीये' या शब्द प्रयोगामध्ये 'नाही आहे' हे अंतर्भूत आहे. बोली भाषेमध्ये 'नाही आहे' असे म्हणण्यापेक्षा नाहीये म्हणणे सोपे वाटते. म्हणून तसा प्रयोग होत असेल.
मला येथे वेगळीच शंका येते.
मी असे ऐकले होते की मराठीमध्ये असणे आणि नसणे अशी दोन स्वतंत्र क्रियापदे आहेत. जसे,
माझ्याकडे पेरू आहे.
माझ्याकडे पेरू नाही.
जसे 'नसणे' हे जर्मन भाषेत काईन ने दाखवले जाते.
इश हाबं आइन पेरू आणि
इश हाबं काईन पेरू :)
पण ईंग्रजी मध्ये अशी सोय नाही.
आय हाव अ पेरू माझ्याकडे पेरू आहे आणि
आय डोन्ट हाव अ पेरू. म्हणजे माझ्याकडे पेरू नाही आहे.
मग मला असा प्रश्न पडतो की 'नाही आहे' असे वापरणे योग्य आहे का?
का नुसते नाही असेच वापरावे? नसणे चे रूप काय होते?
--लिखाळ.