यांच्या निवडणुकीच्या कविता:
तरुणांना विचारले
पुढे काय करणार
मेडिकल-एमबीए वगैरे
तर सारे एकमुखाने लोकसभेत जाणार म्हणाले
तिथे एन्ट्रन्स एक्झाम नाही
क्वालिफिकेशन तर मुळीच नाही.
त्याने बॅनरच्या कापडाचे
लेंगा शर्ट शिवले
नको त्या ठिकाणी
पक्षाचे चिन्ह जाऊन बसले