वर्गीकरण नव्हते ही माहिती तुम्ही नेमकी शोधून काढलीत.
नवा लेख आला की तो जतन करतेवेळी सर्व विदासारणी क्षणभर बंदिस्त केलेल्या असतात. मध्ये सेवादात्याच्या ठिकाणी काहीतरी समस्या निर्माण झाल्याने म्हणा किंवा दोन वेगवेगळ्या गोष्टी अगदी एकसमयी झाल्याने म्हणा, काहीतरी दोष निर्माण होऊन वर्गीकरणाच्या सारणीत चुकीची माहिती नोंदली गेली. (नेमके कारण कळलेले नाही.) आता वर्गीकरण ठीक केल्याने इतर लेखांप्रमाणे हे लेखनही विविध याद्यांमध्ये दिसू लागेल.
जागरूकपणे दोष उघडकीला आणल्याबद्दल धन्यवाद.