मग मला असा प्रश्न पडतो की 'नाही आहे' असे वापरणे योग्य आहे का?
का नुसते नाही असेच वापरावे? नसणे चे रूप काय होते?

मलाही हेच प्रश्न पडतात. 'नाही आहे' ऐवजी केवळ 'नाही' चालेल. पण मी अनेक ठिकाणी, अगदी  व्याकरणाच्या पुस्तकात, 'तो येणार नाही आहे' अशी वाक्यरचना बघितली आहे. नुसते 'नाही' वापरणे योग्य आहे काय, ह्याची खातरजमा करावी लागेल.

चित्तरंजन