मृदुला,

तुमचा प्रतिसाद वाचून जे मुद्दे मनात आले, ते सांगावे म्हणून हा उपप्रतिसाद.

रुखवतातील घटक पदार्थ करून देण्याची जबाबदारी केवळ स्त्रीवर्गाची आहे असे दिसते आहे.

रुखवत म्हटलं की परंपरागत चालत आल्याने म्हणा किंवा इतर उपजत आवडीमुळे म्हणा, या प्रकारात स्त्रीवर्ग हिरीरीने भाग घेताना दिसतो. रुखवत बनवण्यात, सजवण्यात, कौतुक करण्यात वगैरेमध्ये पुढाकार घेताना दिसत असल्याने त्यांचा अशा चर्चांमध्ये विशेषकरून उल्लेख होताना दिसतो पण म्हणून ती 'जबाबदारी' केवळ स्त्रीवर्गाचीच असते अशातला अजिबात भाग नाही.

आठवण म्हणून एकेक वस्तू करून घ्यावी असे म्हटले तर मग आजोबा, काका, मामा या लोकांची आठवण का नको?

नक्कीच हवी आणि तेही तितकेच हौशी आणि दर्दी असल्यास आठवण म्हणून त्यांच्या हस्तकौशल्याने रुखवतात नक्कीच भाग घेतात. 

तसेच मुलगा आणि मुलगी दोघे नव्या घरी राहायला जातात तर मग मुलाच्या नातेवाईकांची आठवण का नको?

झकास मुद्दा आहे. पुर्वी नवरीमुलगी नवऱ्यामुलाच्या घरी जात असल्याने मला वाटतं 'रुखवता'चा मार्ग हा काहिसा एकतर्फी वाहतुकीचा असल्यासारखा होता. अर्थात त्यातदेखील वरपक्षाकडील मंडळी हौशी असल्यास मोत्यांचा नारळ, वधुवरांसाठी मुंडावळ्या बनवणे ( तयार मुंडावळ्यांची पद्धत आताआताशा निघालेली आहे, पुर्वी हाताने विणून बनवल्या जायच्या ), वधूसाठी दागिने ( सोनाराकडून बनवून घेण्यात येतील असे सोन्याचे नव्हेत.. तर स्वतःच्या कलाकुसरीने बनवलेले मोत्यांचे ! ), वधूवर जेवायला बसतील तेव्हा त्यांच्या जेवणाच्या ताटाभोवतालची सजावट वगैरे प्रकार वराकडील मंडळी करायची. हळूहळू हेही सर्व प्रकार वधूपक्षाकडे सरकवण्यात आले हा भाग अलाहिदा ! :-)

आता काळ बदललेला असल्याने बदललेल्या परिस्थितीनुसार वधूवरांच्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या भावनांना आणि आवडनिवडींना लक्षात घेऊन तीनुसार आवश्यक गोष्टींमध्ये आपली आठवण गुंफून देता आली तर बघावे असे वाटते.