काही वर्षांपूर्वीपर्यंत मीही अगदी कटाक्षाने वाटत आहे, कुठे चालला आहात, नाही आहे अशी शब्दरचना करत असे. पण नंतर वाटतंय, चाललायत, नाहीये असे पुस्तकांमध्ये वाचायला मिळाले. त्याची हळूहळू सवय झाली आणि मग ते चूक वाटेनासे झाले. स्वतःशी असाही युक्तिवाद केला की जे लेखन अनौपचारिक असेल तिथे वाटतंय चालेल, औपचारिक लिखाणात मात्र वाटत आहे असेच असावे. पण अलीकडे जेव्हा काही सिद्धहस्त लेखकांच्या लिखाणात म्हणजे ऐवजी म्हंजे असं वाचलं तेव्हा मात्र मी हतबुद्ध झाले!

म्हणून मला असे वाटते की खरा प्रश्न रेघ कुठे मारायची? हा आहे.