नंदिनीशी हुज्जत घालत बसल्याने वसुधाला विमानतळावर जाऊन पोहोचायला काहीसा उशीर झाला पण ती तिथे बघते तर काय.. विमान २ तास उशिराने येणार आहे असे कळल्याने विश्वाससाठी आलेले सगळे निघून गेलेले होते ! तिने मात्र तिथेच थांबून विश्वासची वाट बघायचा निर्णय घेतला...