परकीय शब्द जसेच्या तसे स्वीकारताना असे करायला हवे असे मला वाटते. शासनाच्या ज्ञानकोशात 'इलेक्ट्रॉनांची संख्या' असे वापर केलेले आहेत ते अतिशय योग्य आहेत असे मला वाटते.
मान्य आहे. वर उल्लेखलेले बहुतेक शब्द छोटे आणि उच्चारायला सोपे असल्यामुळे अगदी सहज रुळले. असे अनेक शब्द ह्यापुढेही येत राहतील.
"जोवर पटेल असा शब्द सापडत नाही तोवर सुचवलेला वापरायचाच नाही", हा एक दृष्टिकोन असू शकतो. किंवा "दुसरा अधिक अनुरूप शब्द मिळेपर्यंत सुचवलेला शब्द हक्काने वापरू" असा दुसराही दृष्टिकोन असू शकतो.
माझा मुद्दा एव्हढाच होता की शब्दशः भाषांतराच्या ऐवजी समर्पक शब्द शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. दरम्यान आधी सुचवलेला शब्द रुळला तर अर्थात पुढे शोधायची गरजही नाही. खाली दिलेल्या उदाहरणांपैकी चंगळवाद हा materialism ला चांगला प्रतिशब्द वाटतो, कारण मराठी समजणार्या माणसाला शब्द ऐकून साधारण अर्थबोध होऊ शकेल असं वाटतं.
हेच शब्द कुणा मान्यवराने सुचवले तर ते लवकर स्वीकारले जातात हे खरेच. उदा.
म्हणून तर मी वर म्हटलं की -
"महेशनी जर वरील शब्द वापरले असले तर अजून चांगले पर्याय असूच शकत नाहीत असं म्हणणं वावगं ठरणार नाही..."