दोन्हीकडच्यांनी केलेलं रूखवत ही कल्पना मस्तच की. एक शंका रूखवताचं जेवण दुसऱ्या दिवशी असतं? माझ्या माहितीप्रमाणे लग्नातच सकाळे लवकर असतं ना..

माझ्या रूखवताची कथाच नाही...

मुळात मी कलाकार असले तरी रूखवतासाठी वस्तू करायला वेळ आणि आवड दोन्ही नव्हती. नवऱ्याला प्रदर्शन नको होते. त्यामुळे काही टेबल मांडले नाही. पण तरी आईने त्या पाच प्रकारच्या वड्या, डबे इत्यादी गोष्टी बांधून दिल्याच बरोबर. मी आईला म्हणाले होते रूखवत मांडायचं असेल तर मी केलेल्या डिझाईन्स ची रेंडरींग्ज मांडू या. मी फॅब्र्क सरफेस टेक्निक (एमएफए करताना २ सेमिस्टर्स घेतल्या होत्या) च्या क्लासमधे केलेलं काम आहे. सिल्क पेंटींग पासून शिबोरी पर्यंत ते ठेवूया. माझे एक आजोबा जुन्या काळातले अनेक बक्षिसं मिळवलेले छायाचित्रकार आहेत. त्यांनी काढलेले काही फोटो मोने चं पेंटींग वाटावं इतके सुंदर आहेत. त्यातलं काही ठेवूया. चालेल का.. तर आजीला आवडली कल्पना (तिच्या भावाने काढलेले फोटो असणार होते ना..:)) पण आई म्हणाली करायचं तर टिपिकल करू. आईची तब्येत आधीच संधिवातामुळे नाजूक त्यात एकुलत्या एक मुलीचं लग्न म्हणून तिला नको इतका उत्साह चढलेला.. मग मी नकोच म्हणाले.. एका अर्थी बरंच झालं ते. लग्नाच्या दीड महिने आधी एक नवीन प्रोजेक्ट मिळालं मला त्यामुळे मी तो दीड महिना मुंबईत होते. लग्न २४ ला आणि आमचं शूट पुढे जात जात सुरू झालं १३ ला. शेवटी माझ्या असिस्टंट्स् वर सगळी जबाबदारी टाकून १५ ला मी पुण्यात आले दुपारी. १६ ला माझ्या हाताची छोटीशी सर्जरी करायची होती ती केली. सगळी माझी आमंत्रणं फोनवर त्यामुळे अनेक जणांचे गैरसमज.. त्याला तोंड देणं इत्यादी इत्यादी... यातून कधी लग्न झालं कळलं पण नाही... :)