अनुप्रिता,

आपल्या लग्नातले रुखवत आवडले. अज्जुका आपला अनुभवही आवडला. रुखवताच्या विचारांशी वेदश्रीशी सहमत.

मला पण रुखवत खूप आवडते. पूर्वी तर लग्न लागल्यावर सर्वच (मुलाकडील व मुलीकडील)  रुखवत खूप कौतुकाने पहात असत. रुखवताचे जेवण लग्नाच्या दिवशी सकाळी असते. लग्न लागायच्या आधी मुलाकडील सर्व म्हणजे नवरा मुलगा, त्याचे आई वडील, बहीण, भाऊ सर्वांची पंगत असते. तिकडे नवरी मुलगी गौरीची पूजा करत असते.

माझ्या लग्नातले एक खास रुखवताचे छायाचित्रही आहे. त्यातील काही वस्तू लग्न झाल्यावर  iitb वसतिगृहात लगेच उपयोगात आल्या. नाडीवर्क पडदा जो लगेच घराच्या दाराला लावला. त्या पडद्याचे खूप कौतुक झाले. आम्ही दोघी बहिणींनी मिळून केला होता.  आमच्याकडे असलेल्या कामवाली बाईने मला एक छोटी स्टीलची कळशी दिली होती खास रुखवात ठेवण्यासाठी. ती रोजच्या पिण्याच्या पाण्याला उपयोगात आली. एका वहिनीने नुकताच नवीन बाजारात आलेला टी-सेट प्लॅस्टीकचा (६ मग व एक ट्रे) दिला होता तो  चहा प्यायला उपयोगात आला.

रुखवताच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद अनुप्रिता.

रोहिणी