आकाशवाणीच्या मुंबई केन्द्रावरुन दुपारी सादर होणारा महिलांच्या 'वनिता-मंडळ' या कार्यक्रमाची व्हायलीनवर वाजवलेली 'नायकी कानडा' रागातील 'शीर्षक-धून' अवीट गोडीची होती.तेवढ्यासाठी आम्ही शाळकरी मुले 'वनिता-मंडळ' नियमाने ऐकत असू! पुढे काही दिवस आम्ही 'नायकी कानडा' रागाला 'वनिता-मंडळाचा राग' म्हणायचो.
आजही माझ्या भ्रमण-ध्वनीची हाक-धूनही तीच ('नायकी कानडा' रागातील तुकडा) आहे व ती बदलण्याची इच्छा अजिबात नाही.
जयन्ता५२