खरंच आहे क्षितिजराव... पण काय करणार..?
दोन घटकेच्या प्रेमासाठी, माऊलीचे आयुष्यभराचे कष्टं वाया ज़ाऊ द्यायचे का..?
ज़्या बापाने लहानाचा मोठा केला, प्रसंगी स्वतः उपाशी राहून आपल्याला ज़ेवायला घातलं, त्याचा घात करायचा..?
हे सगळे करण्याआधी आपणही कधीतरी आई-बाप होणार याचा विचार केला तर ही वेळच यायची नाही.
संस्कृति एकवेळ राहु देत.. पण कौटुंबिक आणि सामाजिक बंधन ही पाळण्यासाठीच असतात.
नाहीतर संस्कृतिरहीत अमेरिकन, युरोपिअन आणि सांस्कृतिक भारतीय ह्यांच्यात फ़रक काय..?
प्रेम करावे, ज़रूर करावे.. पण, कौटुंबिक आणि सामाजिक बंधनांच्या आड येत असलेले प्रेम सोडायची तयारीही ठेवावी.
बाकी, छान लिहिलेस...उत्तम!
नितिन