भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ' आकाशवाणी' च्या मुंबई केंद्राने १९४७ ते १९९७ या पन्नास वर्षातील 'सर्वोत्कृष्ट दहा' पुस्तके निवडायचे आवाहन श्रोत्यांना केले होते. आकाशवाणीवरून सातत्याने निवेदन देऊन, नियतकालिकांतून निवेदन प्रसिद्ध करून, वाचकांच्या शिफारशी मागवल्या होत्या . त्यात निवडली गेलेली पुस्तके.
( काहींना समान गुण मिळाल्याने एकाच क्रमांकावर दोन-तीन पुस्तकेही आली.त्यामुळे यादीत अठरा पुस्तके आहेत.)
- ययाति / वि. स. खांडेकर
- कोसला / भालचंद्र नेमाडे
- बलुतं / दया पवार
- स्वामी / रणजित देसाई
- नट सम्राट / वि. वा. शिरवाडकर
- ऋतुचक्र / दुर्गा भागवत
- मृत्युंजय / शिवाजी सावंत
- काजळमाया / जी. ए. कुलकर्णी
- रथचक्र / श्री. ना. पेंडसे
- युगान्त / इरावती कर्वे
- व्यक्ती आणि वल्ली / पु. ल. देशपांडे
- बटाट्याची चाळ / पु. ल. देशपांडे
- मर्ढेकरांची कविता / बा. सी. मर्ढेकर
- पानिपत / विश्वास पाटील
- दुर्दम्य / गंगाधर गाडगीळ
- बहिणाबाईची कविता / बहिणाबाई चौधरी
- माणदेशी माणसं / व्यंकटेश माडगूळकर
- सनद / नारायण सुर्वे
संदर्भ आणि आभार: अंतर्नाद दिवाळी २००६