कोणत्याही भाषेसाठी मुख्यतः तिन कसोट्या आहे.
१. भाषेला लिपी असावी.
२. भाषेला व्याकरण असावे.
३.तिचा बोलण्यात वापर व्हावा.
या कसोटीवरच भाषेचा कस लागावा. शुध्दलेखनाच्या बाबतीत माझ्यामते थोडे निकष सुरवातील सैल असावे. लोकांनी भरपुर लिहणे आवश्यक आहे. शेवटी भाषा ही सुध्दा प्रवाही असते त्यामुळे बदल ही स्वाभाविक असतात.
दुसरा मुद्दा म्हणजे आज इग्रंजी भाषेत जे बदल चालले आहेत त्यामुळे मुळ इग्रंजी भाषाच नष्ट होण्याची भिती सर्वसाधारण पणे व्यक्त होत आहे.
अशा चर्चा चालु असतांना मला नेहमीच संस्कृत भाषेची आठवण येते. अतिउत्साह आणि हट्टामुळे संस्कृत भाषाच मृतप्राय झाली आहे हे विसरु नये.
प्रशासकच्या उदार धोरणाचे मी स्वागतच करतो.
हिरामण.