नितिन,
पुणेरी कंडक्टर बद्दल एकदम पटलं!
माझ्या एका बंगाली मित्राने त्यासाठी बसमध्ये लागणारी मोजकी मराठी वाक्यं शिकून घेतली होती. तरीही 'चिंचवड' हा शब्द उच्चारताना तो पुण्यातच काय पण महाराष्ट्रातही नवीन आहे हे कुणीही ओळखू शकत असे! :-)
पण भाजीवाल्यांचा मात्र उलट अनुभव आहे. डोंबिवलीत राहत असताना "३ रु. पाव तर ५ ला अर्धा किलो देणार का?" असं आम्ही विचारत असू. त्या सवयीप्रमाणे माझ्या आईने कोथरुडच्या भाजीवाल्याला तोच प्रश्न विचारला असता "मग तुमच्यासाठी ४ रु. पाव आहे" असं पुणेरी उत्तर मिळालं होतं!
- केदार