माझे रुखवतासंबंधीचे मत प्रियालीशी मिळतेजुळते आहे.वेडिंग रजिस्ट्रीची कल्पना मलाही खूप पटते. आणी काळानुसार हौस वगैरे प्रकार कितीसा राहणार आहे अजून? एवढा वेळ तरी कोणाला राहणार आहे पुढे. आजी पणजीच्या काळात बरे होते. त्यांना वेळही होता आणी हाच विरंगुळाही होता.पण आता काळाचा वेग बघून लग्न, हौसमौज केली पाहिजेत असे मला वाटते.असो.
रुखवतासंबंधिची अजून एक आठवण म्हणजे पूर्वीच्या लग्नाच्या सर्व छायाचित्रांमध्ये वधू वराला रुखवत दाखवते आहे असे एक छायाचित्र हमखास असायचे. खरेतर त्या कृष्णधवल चित्रात वस्तू फार काही ओळखू यायच्या नाहीत पण ते छायाचित्र बघायला मात्र जाम मजा यायची.