प्रिय भाष,
आपल्या प्रतिसादाबद्दल आणि दीर्घ खुलाशाबद्दल धन्यवाद...
त्यामुळे माझी मतं काही प्रमाणात तरी बदलली हे मान्य करतो...
१) सी. एन. एन. वरून जे ऐकलं त्याप्रमाणे विभाग-पुनर्रचना सोपी वाटली होती (निवडणुकांसाठीची पक्षाला उपलब्ध 'सोय' वाटली होती).. ती तुमच्या लेखनावरून तशी नाही, हे पटलं... धन्यवाद.
२) गेले २३० वर्षे सतत त्याच पद्धतीने अगदी नियमित निवडणुका घेणाऱ्या देशाचे कौतुक न वाटणे हे माझ्यामते मनाच्या कोतेपणाचे लक्षण आहे. अशा देशाचा नागरीक म्हणून मला अर्थातच अभिमान वाटतो ही तितकीच खरी गोष्ट आहे.
मी तुमच्या अभिमानाचा आदर करतो....
३) भारतालासुद्धा ब्रिटिशांकडून या गोष्टी मिळाल्या परंतु भारतियाची सरंजामशाही, जातीभेद, एकसंघत्वाचा अभाव आणि शिस्तविरोधी मनोवृत्ती यामुळे त्याचा पुरेपूर फायदा आपण घेऊ शकलो नाही. तरीही भारत हा इतर मांडलिक देशांपेक्षा जास्त चांगल्या स्थितीत आहे आणि त्याबद्दल अभिमान वाटायला पाहिजे. खेद आहे की पहिल्या रांगेत उभा राहण्याची क्षमता असून वरील कारणाने ते होऊ शकले नाही.
हेही अगदी पूर्णपणे मान्य.
४) कदाचित, (किंबहुना खरं तर) अमेरिकेच्या परराष्ट्र-नीतीमुळे (उदा. इराक-नीती, लादेनसारखे भस्मासूर आधी त्यांनीच निर्माण केले / जगावर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती/ तेल मिळवण्यासाठी युद्ध करणे / भारताच्या विरोधी नुकतंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीसाठी केलेलं मतदान, इ.) इतका अनादर वाटायला लागतो, अमेरिकेचा वरच्या सगळ्या गोष्टींबद्दल आदर वाटायचा राहून जातो. अर्थात, 'बळी तो कान पिळी' याप्रमाणे आपण मुद्द क्र. ३ मधे म्हटल्याप्रमाणे भारतात अजून पहिल्या क्रमांकात यायची क्षमता आलेली नाही, हे खरं आहे. बहुधा माझी आधीची प्रतिक्रिया अशी एककल्ली होती. त्याबद्दल कृपया क्षमस्व.
- कुमार