व्यक्तिसापेक्षताचा मुद्दा पटला. माझ्या कानांना 'नाहीये, गेल्ये, रडल्ये, उठल्ये, बसल्ये' आवडत नाहीत. नाटकी वाटते. 'गेलेलो', 'आलेलो' मुंबईकरांना खटकणार नाहीत. पण मला मात्र खटकू शकतात.

कवितेत 'तुझिया', 'माझिया', 'अमुचा', 'अता, 'अम्ही' सारखी रूपे नाइलाज म्हणून येतात. कारण अनेकदा वृत्तात नेहमीच्या वापरातले शब्द बसत नाहीत. आणि आशय महत्त्वाचा असतो.

'झाल्यात', 'केलेत' ही रूपे माझ्या कानांना खटकत नाहीत.