बोलताना बोलते आहे असे पटकन म्हणताना बोलत्ये असे ऐकू येते, मात्र तो बोलते आहे हाच पटकन केलेला उच्चार असतो (किमान असावा, असायला हवा) म्हणून मला लिहिताना बोलत्ये, करत्ये वगैरे लिहिलेले खटकते. मात्र अनेकांना अशा प्रकारे लिहिण्याची आणि वाचण्याचीही इतकी सवय झाली आहे की काही दिवसात तेच (रूढ म्हणून) योग्य असे सगळे समजू लागतील अशी भीती वाटते.