रिअल नंबर्स साठी वास्तव संख्या हाच शब्द बीजगणितात (पाठ्यपुस्तकात)होता.
मात्र विश्वमोहिनींनी म्हटल्याप्रमाणे संयुक्त संख्या हा शब्द कॉम्प्लेक्स नंबर्ससाठी न वापरता कंपोझिट नंबर्स (ज्या संख्या मूळ संख्या नाहीत अशा) साठी वापरण्यात आला होता, हे चांगले लक्षात आहे (मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांच्या अभ्यासादरम्यान इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या या व इतर शब्दांशी ओळख झाली होती)
नवीन अभ्यासक्रमानुसार कॉम्प्लेक्स नंबर्सशी ओळख इयत्ता अकरावीमध्ये होत असल्याने त्यापूर्वी मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांस कॉम्प्लेक्स नंबर्सची ओळख असणे शक्य नाही. त्यामुळे संयुक्त संख्या हा शब्द कॉम्प्लेक्स नंबर्ससाठी पुस्तकात वा अभ्यासात वापरला गेला असणे अशक्य वाटते. तो कंपोझिट नंबर्ससाठी वापरला गेलाय, हे मात्र नक्की.