कथा म्हणून आवडली पण शेवट सरसकट आणि रूढ मार्गाचा वाटला. त्याच्यातील बदल हा पुरुषत्वाचे निदर्शन आहे असे वाटत नाही. कदाचित कथानायिकेच्या वडलांनी केलेल्या मदतीबद्दलची कृतज्ञता अथवा टवाळीबद्दल नावड असेही याचा निष्कर्ष निघू शकतो.
हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे अश्या मुद्द्यांचा विचार केला तर प्रस्तुत लेखिका एक चांगली लेखिका म्हणून पुढेमागे प्रसिद्ध होऊ शकते या सदिच्छेपोटी ही सूचना.