न्याय मिळवण्या करिता आंदोलन हा एक मार्ग आहे , तो अनुसरलाच पाहिजे. ज्यांना समाजजीवन  न्याय्य व्हावे वाटते त्यांनी आगपाखड करणे आवश्यक नसते,आंदोलने करताना ती टाळणे बरे.आगपाखडीला माध्यमात प्रसिद्धी अधिक मिळते हे खरे पण त्याच वेळी दर्जेदार नेतृत्वक्षम व्यक्ती  मागे पडण्याची शक्यता असते.ताणा पण तुटू नका देऊ. कायदा आणि त्याची अंमलबजावणी कठोरपणे झालीच पाहिजे.

वर "नितिन" रावांची आगपाखड समाजांना न सांधणारी आहे. न्याय-अन्यायाचे प्रश्न हातात शस्त्र घेऊन किंवा वेगळे देश बनवून सुटणारे नसतात. ब्रिटीशपूर्व काळात भारत असंख्य छोट्या छोट्या राजवटींचा देश होता पण अन्याय नव्हता काय. आफ्रिकेत एकच वंशाचे आदिवासी एकमेकांवर अन्याय करताना दिसतात. अन्याय हि वृत्ती असते तीच्या विरुद्धच लढा लढवलाच पाहिजे , पण लढा देताना आपल्याच आदर्शांच्या मूर्तीवर आपल्याच हाताने अहिंसेचे शिंतोडे आणि गालबोट लागणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे.

मुख्य म्हणजे कायदा आणि सुव्य्वस्था काही अंशीच मदत करतो, सामाजिक समरसतेची मांडणी आम्ही आणि तुम्ही प्रत्येकाने चिमुट चिमुट मेहनतीने करायची असते.

-ऋऌ