या शीर्षकाचे बर्ट्रांड रसेल यांचे पुस्तक यासंदर्भात निश्चितच वाचनीय आहे. काळाच्या ओघात टिकून राहिलेल्या काही आदिम जमातींच्या चालीरीतींचा अभ्यास करून, पूर्वी बहुतांश संस्कृती मातृसत्ताक होत्या आणि स्त्रीला आपला जोडीदार निवडण्याचे (लग्न नव्हे) स्वातंत्र्य होते, असे लेखकाचे प्रतिपादन आहे. पुढे, शारीरिक श्रमांची निकड अधिक भासू लागल्यावर स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा हळूहळू संकोच होत गेला.