"काय द्याचं बोला" हा फारच छान चित्रपट आहे. त्यांत भरपूर करमणूक तर आहेच. त्याशिवाय, विनोदाच्या माध्यमांतून त्यांत काही महत्त्वाचे विषयही हाताळले आहेत. अशा चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला नसता तरच नवल!
अलीकडचे काही मराठी चित्रपट (उत्तरायण, सरींवर सरी, सातच्या आत घरांत, इ.) पाहिल्यावर मराठी चित्रपटांचा दर्जा बराच उंचावल्याचे दिसून येते. ही प्रगति अशीच होत राहिली तर हिंदी चित्रपटांना चांगली स्पर्धा निर्माण होईल.