चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्याच्या आधी कृष्ण धवलमध्ये कोणतातरी छोटा कार्यक्रम दाखवायचे त्याचे नाव माहिती आहे का कुणाला? शिवाय थोड्या जाहिराती व चित्रपट संपल्यानंतर पडद्यावर तिरंगा झेंडा व जन गण मन. हे सुरु असताना सर्व पेक्षक उभे रहात असत व ते संपल्यावरच बाहेर पडत.