कितीही झाले तरी ईंग्रजी ही भारतीय भाषा न्हवे. आपण त्या "न गंगदत्तः पुनरेति कुपम्" गोष्टीतल्या बेडकांप्रमाणे भांडत (ही माझी ती तुझी करत) राहीलो तर हा ईंग्रजी सर्प आपल्या सर्व विवीध भाषिक बेडकांना एक एक करून खाऊन टाकेल (अर्थात convert - परिवर्तीत करेल). ईंग्रजी भारतीय भाषा नसली तरी निसेसरी एव्हील म्हणतात तशी वापरावी लागते, त्याबद्दल खेद वाटतो. आपण दैनंदिन जिवनातल्या ईंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द शोधण्याचा प्रयास करावा व त्यांना प्रचलीत करण्याचा प्रयत्न करावा असे मला सुचवावेसे वाटते. तसे न झाल्यास एक एक शब्द करून संपुर्ण भाषांचा -हास होईल, मराठी व ईतरही भारतीय भाषा अस्तित्वात रहाणार नाहीत. हा एक सामुहीक निकडीचा प्रश्न आहे. माझे मराठीवर अत्यंत प्रेम आहे यात शंका नसावी, तरीपण मला हिंदी किंवा ईंग्रजी निवडायचा प्रसंग आला तर माझे मत हिंदीलाच जाईल. हिंदीचा जागी तामिळ किंवा ईंग्रजी निवडायचा प्रसंग आला तर माझे मत तामिळला गेले असते. कारण हिंदीत काय किंवा तामिळमधे काय संस्कृतचा खुप समावेश आहे, त्या भाषांचे लोक अजुनतरी जे काही हिंदू ऊरले आहेत, आपलेच देव पुजतात. जर आपण सर्व एकत्र येऊन संस्कृतला पुढे आणले तर आपण पुन्हा एक होऊ शकू.
म्हणुनच आपल्या (व ईतरही भारतीय) भाषांवरील व संस्कृतीवरील प्रेमापोटी, मी एक एडिटर (http://mysite.verizon.net/vzeukz9m/myLanguageEditor.htm किंवा http://mysite.verizon.net/suhas_jambhekar/myLanguageEditor.htm) बनवला असून, तो मी आपणास देऊ ईच्छीतो.
सुहास