संधी होण्याची शक्यता आहे तेथे तो केलाच पाहिजे असा काही नियम आहे काय? कोणाला ज्ञात असल्यास कृपया खुलासा करावा.
संधी होत असल्यास करायलाच हवी असा नियम आहे. असे असले तरी लोक अतिउत्तम, प्रकृतिअस्वास्थ्य लिहितात. आता ते रूढ झाले असावेत. हे शब्द खरे तर अति-उत्तम, प्रकृति-अस्वास्थ्य असे लिहायला हवेत. असे एका तज्ज्ञाकडून कळले. अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे.