वरदाताईंशी सहमत.
जुन्या मराठी साहित्यात स्त्रियांच्या तोंडी सर्रास "मी आल्ये, मी गेल्ये, मी करत्ये" असे संवाद येत असत. पुरुषांच्या तोंडी जर हे आलेले दिसले तर त्याला चुकीचेच म्हणावे लागेल. आले आहे, गेले आहे, करते आहे यांचीच ही संक्षिप्त रूपे.
याचप्रमाणे कोकणात एखाद्या पुरुषाविषयी "तो काय बोलताय" (पुन्हा, बोलत आहे याचे लघुरूप) असे म्हणतात.
याला आम्ही घाटावरचे लोक "बोलतोय" (बोलतो आहे) असे म्हणतो व आम्हाला हेच योग्य वाटते. याउलट कोकण्यांना तेच रूप बरोबर वाटत असेल.
अशी रूपे संवादांत (हा प्रत्यक्ष उद्गार) किंवा कवितांत (हा मनाचा उद्गार) आली तर त्यात गैर मानण्याचे कारण नसावे.
मात्र शिष्ट भाषेत किंवा प्रमाण लिखित भाषेत अशी रूपे नसणे हे अधिक बरोबर वाटते.
"नाही आहे" याची बहुधा भाषेत कुठेतरी गरज आहे. जुन्या मराठीतले कित्येक शब्द आता वापरातून गेले आहेत त्याची भरपाई अशी कशीतरी करणे भाग पडणारच असे वाटते.