सर्वानी अतिशय मुद्देसुद आणि वस्तुनिष्ठ असे विवेचन केले आहे. यात एक आठवण.
टेंबे स्वामी उपाख्य वासुदेवानंद सरस्वती नावाचे मोठे आधिकारी पुरुष होवुन गेले. त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथ लिहले. त्यांच्या एका ग्रंथावर काशीच्या विद्वान लोकांनी आक्षेप घेतला कि त्यामधे व्याकरणाचे नियम पाळलेले नाही. हे ऐकून टेंबे स्वामीना विषाद झाला. त्यांनी दत्तात्रयाला साकडे घातले कि "देवा, तुझ्याच स्फुर्तीने मी हे लिहले असतांना यात चुकी कशी काय आली?". तेंव्हा दत्तात्रयाने अनेक अप्रचलित व्याकरण पध्दतीचा दाखला दिला आणि त्या आक्षेपाचे निरसन केले.
यातील दैवी भाग सोडला तर मतितार्थ हाच आहे कि मनाने स्फुरलेले असलेलया भाषेला सर्वच नियमांनी बंदीस्त करण्याची आवश्यकता नाही.
काही लोकांना थोडेफार असंबध्द वाटेल पण.... वाटले म्हणुन लिहले.