महाराजांना एक पांढरा उंदीर दिसला. ते म्हणाले असे ऍडॉल्फ, कोण आहे रे तिकडे? हिटलर म्हणाला तो आमचा जानी दुश्मन आहे. टोनी ब्लेअर. त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी नुकतेच हाकलले आहे. त्याची झुडुपाशी चांगली दोस्ती आहे. त्यामुळे तो झुडुपाच्या आश्रयाला आले आहे. पण इतका काळ एकत्र राहून सुद्धा त्याला झुडुपाची निती कळली नाही. गरज सरो वैद्य मरो. तुम्ही काळजी करू नका महाराज. झुडुप त्याला पाहून घेईलच आपल्याला काहीच करायची गरज नाही. तुम्ही निश्चिंत राहा.