खालील शेर अधिक आवडले.*

आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

फार आवडला. (सांगायला खूप असतं, काळजाचे कान करणारी माणसं कोठे भेटतात सहसा.)

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

:)) सही. याचे वारसदार कोण कोण ते ठरवायला लागेल.

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?

यावर काय बोलावे? शांतता खूप काही बोलून जाते.

गज़ल आवडली.

*मला कविताक्षेत्रातलं फारसं काही कळत नाही याची जाणीव आहे.

प्रियाली