एक विनंती ,

आधी मनोगतावर काही काळ घालवा, म्हणजे मनोगतावर कुठे काय आहे याची पूर्ण कल्पना येईल. हा प्रश्न तुम्ही चर्चेत विचारणे योग्य झाले असते, असो.

मनोगत हे युनिकोड नावाचं प्रमाण वापरतं जे तुमच्या संगणकाच्या चालनाप्रणालीला(orprating system) ज्ञात असणं आवश्यक आहे. आणि त्या नंतर युनिकोड ज्ञात असलेला एखादा संपादक तुम्ही वापरून सहज हव्या त्या मजकुराचे मुद्रण करू शकता. आता हे युनिकोड काय आहे हे मराठीतून माहिती करून घ्यायचे असल्यास उजव्या समासात शोधा वर टिचकी मारा, नंतर त्या कप्प्यात युनिकोड लिहा आणि शोधण्याचा आदेश द्या आणि बघा मनोगतावर तुमच्या जवळपास प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आधीच कुणी देऊन ठेवलेलं असेल.

आणि जर का तसं नाही आढळलं तर मग खुशाल विचारा आम्ही येथे पडीक असतो ते कशाला? तुमच्यासाठीच की राव ! ;-)

तर मग असं करा, आणि हो , आपला अनुभव येथे द्यायला विसरू नका.

नीलकांत