अहो, चहा म्हणजे आमचा एकमेव टा(ईम).पा(स).
सहज, मित्र भेटला म्हणून , आज जागायचे आहे आणि आता करायला काहीच नाही असं म्हणून सुद्धा आम्ही चहा घेणारी माणसं. आम्ही चहावर प्रेम करतो असं म्हणा हवं तर.
चहाला अमृततुल्य गोडी असते असं पुण्यात यायच्या आधी वाटायचंच पण पुण्यात तर अमृततुल्य नावानेच चहा विकला जातो. या अमृततुल्य चहाचे दुकानदार म्हणजे एक प्रस्थ असतं. म्हणजे बघा ना ! या आधी चहा करणे म्हणजे एक साधी क्रिया आहे असा माझा समज. मात्र या अमृततुल्यचे दुकानदार चहा करतील तो अगदी पारंपरिक पद्धतीने. चहा बनविने ही आमची परंपरा आहे या थाटात. वेलची ही मांडीवर आणि पितळेच्या खलबत्त्यातच बारीक केल्या गेली पाहिजे हा कटाक्ष. सोबत पुणे असल्यामुळे ... कटिंग मिळणार नाही. पाणी हाताने घेणे, सुट्टे नसल्यास आधीच विचारणे आदी.. आदी च्या पाट्या आल्याच. एक मात्र खरं की चहा चांगला असतो.
चहा बद्दल असं काही कधी मत असेल असं वाचून फार गंमत वाटली. मुलांनी चहा घेऊ नये असं पारंपरिक मराठी मत माझ्याही घरी होतं मात्र मी नेहमीच बिघडलेला मुलगा होतो(आहे).
नीलकांत