माझी आजी (आईची आईच) आणि तुमची आजी एकच नाही कारण माझी आजी हयात नाही परंतु मिळते जुळते मुद्दे पहा:
- गोरापान रंग, निळसर घारे डोळे, उंच, उत्तम तब्येत आणि एकदम हाडाची कोकणस्थ! (अधोरेखित वगळून)
- आजच्या मुलींविषयी तिला खूप कौतुकही वाटते (आणि सुनांविषयी ही वाटे, त्यांची बाजू नेहमी नेटाने मांडत असे). नोकरी, घर, मुले सांभाळतात. चांगल्या शिकतात. अन्याय झाला तर सहन नाही करत बसत.
- तिला वाचनाची खूप आवड. पेपर तर आवडीने वाचतच असे.
- तिच्या हाताला अप्रतिम चव! साधी फोडणीची पोळी केली तरी इतकी चविष्ट लागायची.
- मूर्तीपूजा मानत नाही. तिचा देवापेक्षा माणसांवर जास्त विश्वास आहे. माणसातच देव असतो असे तिचे मानणे! (विधवा, वांझ स्त्रिया असल्या भाकड गोष्टींवरही विश्वास नाही.)
माझी आजी असती तर १००ची असती.
लेख मनापासून आवडला.