वर मेहनतीचे मार्ग सुचवावे असे लिहिल्यावर आपल्याला काही उदाहरण सुचते आहे का असा विचार केल्यावर मुळात ही गोष्ट लक्षात आली की उदाहरण शेजारीच आहे.
आपण दिलेले उदाहरण अगदी योग्य आहे. अशाच पद्धतींनी समरसता येऊ शकते.
खैरलांजीतील घटना निःसंशय निषेधार्ह आहे. त्याकडे दलिंतावरील अत्याचार म्हणून बघण्याऐवजी मी स्त्रियांवरील अत्याचार असे म्हणून बघत होते. एखाद्या घटनेला दलित-उच्चवर्णीय संघर्षाचा रंग दिला तर मला लागलीच त्यात काहीतरी राजकीय गणित असावे असा संशय येतो.
हा स्त्रियांवरील अत्याचार वगैरे काही नसून दलितांवरील अत्याचारच आहे. अत्याचार होण्याचे कारण ती व्यक्ती स्त्री होती हे नाही. चार व्यक्तींना जमावाने मारले आहे. यात दोन पुरुष आणि दोन स्त्रिया होत्या.
जिवानिशी जाणाऱ्यांच्या टाळूवरचे लोणी तथाकथित नेते नक्राश्रू ढाळत मोठ्या चवीने खातात असेच वाटते.
सहमत. अशा प्रकारांचे भांडवल करण्यात सगळेच पुढे. विशेषतः रिपब्लिकन पुढारी.