कवितेतलं फारसं काही कळत नसल्याने गद्यावर आधारीत प्रतिसाद देत आहे.

मराठी वाचकांना लुसलुशीत, शब्दबंबाळ साहित्य आवडते असे मला वाटते. एकंदर मराठी साहित्यात (विशेषतः कवितांत) ललितलुलित, गोंडसगोजिरे शब्द, तसेच विशेषणांचा, क्रियाविशेषणांचा भडिमार दिसतो.


शक्य आहे. एखाद्या कल्पनेचा विस्तार ठराविक पद्धतीनेच करावा लागतो असे मनात ठसल्यामुळे असे होत असावे की काय असे वाटते. अशा लेखकांना नावीन्याची कमतरता जाणवत असावी व वाचकांना ती भासत असावी की काय हे कळत नाही.

त्यामुळे कल्पनाविस्तार करताना तोच तोचपणा येतो हे मात्र खरे. बरेचदा थेट आणि नेमके शब्द पुरेसे असतानाही विशेषणांचा भडिमार केल्याने लेखातली लज्जत कमी होते.

ह्या गोष्टीला बऱ्याच अंशी मराठी वाचकच कारणीभूत असावेत.

नक्की सांगता येत नाही, वेगळे वाचायला मिळाले तर वाचक वाचणार नाहीत का? अर्थात येथे स्मरणरंजन, चाकोरीबाहेर पडण्याची भीती असे प्रकार असावेत असेही वाटते.

ज्यांत मुळातच दम नसतो, त्या पोकळ आणि आवखोर साहित्याला ललितलुलित शब्दांचा, विशेषणांचा, कॢप्त्यांचा भुसा लागतो असे माझे मत.


सहमत. यांचबरोबर थोडाफार दम असला तरी तो विशेषणे, वर्णने यांचा भारंभार वापर केल्याने निघून जातो. लेखकाला नेमके काय सांगायचे आहे ते दूर राहते. (की लेखकाला नेमके काय सांगायचे आहे हे त्याला स्वतःलाच कळलेले नसते?)

अशाप्रकारे लिखाण शब्दबंबाळ झाल्याने बरेचदा मूळ लिखाणातील गांभीर्य, प्रणय, दु:ख अशा भावनांचा मेळ जमत नाही.