आपण उद्धृत केलेली सर्व उदाहरणे पद्य आहेत असे वाटते. आपणाला फक्त लुसलुशीत पद्य आवडते असे म्हणायचे आहे का?
आता काही उदाहरण देतो. ही सगळी काव्ये बक्कळ लोकप्रिय झाली. त्यात तुम्ही म्हणता त्यातील एकही (लुसलुशीतपणा, शब्दबंबाळता) नाही, उलट घणाघाती शब्दप्रयोग आहेत -
जोड झणी-कार्मुका, सोड रे सायका;
मार रे त्राटिका, रामचंद्रा.
अथवा -
उषःकाल होताहोता, काळरात्र झाली;
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.
किंवा अगदी -
कशास आई भिजविसि डोळे उजळ तुझे भाळ । रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते । उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदण्ड तव पायांमधले खळाखळा तुटणार , आई; खळाखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार!
कोठे आहे तो लुसलुशीतपणा?!?
मला वाटते शोध घेतल्यास कितीही प्रमाणात कोणत्याही प्रकारचे गद्य-पद्य मराठी साहित्य-सागरातून शोधून काढता येइल.
असो.
क. लो. अ.
अ. ना.