चित्तोपंत,
सुंदर गझल...
ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)...
सुंदर.

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?
हे दोन शेरही अधिक आवडले.

'अमेची' आणि 'आंधळी' हा सर्केश्वरांनी सुचवलेला बदल हे दोन्ही मला तितकेसे पटले नाहीत. 'आंधळी' मधूनही 'चंद्र' नसलेली (काळोखी) किंवा (आंधळेपणाने - चंद्र येणार नाही हे ठाऊक असूनही) असे दोन्ही अर्थ स्पष्ट होत नाहीत.

हा शेर-

'मी रात्र का तरीही जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला....
'
 
असा केला तर?

किंवा थोडा अर्थ बदलून-
आहेच रोजची ही अमुची लपाछपी..
येणार चंद्र नाही भेटायला मला...
असा केला तर?
(इथला 'अमुची' हा शब्द मला स्वत:ला थोडा खटकला.)

- कुमार