अनिरुद्ध,
ही गझल आवडली. कल्पना चांगल्या आहेत, विशेषतः मतला आणि ३, ४ क्र. चा शेर.
काही विनंतीपर सूचना:
(१) गझलेत ५ शेर असावेत असा नियम आहे.
(२) गझल वृत्त-बद्ध असावी. ही गझल बऱ्यांपैकी वृत्तनियमांत बसणारी आहे. तुमच्या बाकीच्या गझलांमधे मात्र हे दिसलं नाही. मतल्यात 'प्रस्थापितांप्रमाणे' हा शब्द मात्रांत बसतो, तुमची बहुधा टंकलेखनात त्रुटी राहून गेली असावी!
तिसऱ्या शेरात 'हासून' हवं - मात्रांच्या दृष्टीनं.
तुमच्या कल्पना चांगल्या आहेत; पण एकदा कै. सुरेश भटांची 'एल्गार'मधली 'गझलची बाराखडी' का वाचत नाही? श्री. चित्त यांनी ती 'मनोगत'वरही लिहिली आहे. 'शोध' घेतल्यास मिळेल.
- कुमार
ता. क. माझं स्वतःचं असं मत आहे (आणि मी माझ्यापुरता घालून घेतलेला नियम आहे) की, दोन लिखाणांमधे (प्रतिसाद सोडून!) अंतर असावं. बघा पटतंय का?