कधीकधी तथाकथित हुशार वाचकांना (म्हणजे ज्यांना 'उच्च'पणे गुलजार, ग्रेस 'जीवघेणा' आवडत असतो) शब्दमधुर धूसरता आवडते असेही आढळून येतो.
येथे गीतकार / कवी गुलजार यांचा उल्लेख आहे या समजाने
ज्यांत मुळातच दम नसतो, त्या पोकळ आणि आवखोर साहित्याला ललितलुलित शब्दांचा, विशेषणांचा, कॢप्त्यांचा भुसा लागतो असे माझे मत.
हे गुलजार यांच्या काव्याला लागू होत नाही. 'पत्थर की हवेली को, शीशोंके घरोंदोंमें, तिनकोंके नशेमनतक, इस मोड पे आते है' हे अतिव कृत्रीम आणि उबवलेले वाटू शकते. पण हे दमहीन आहे, असे मला वाटत नाही.' वो यार है जो खुशबू की तरहा, जिसकी जुबाँ उर्दू की तरहा, मेरी शामरात, मेरी कायनात, वो यार मेरा छैंया छैंया' हे अगम्य वाटू शकेल, पण तरीही हे उत्तम काव्य आहे. शब्दांचा / उपमांचा चमत्कृतिपूर्ण वापर हे गुलजार यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. अर्थात बऱ्याच कवींनी / लेखकांनी या गोष्टीचा वापर आपले कल्पनादारिद्र्य लपवण्यासाठी केला, हा भाग वेगळा.