"असे मराठी हा करमणुकीचा विषय नसून ती एक समस्या आहे असे म्हटले तर मात्र ह्या आनंदावर पाणी पडते. समस्येवर उपाय सुचवणे हे दुर्दैवाने तितकेसे खुसखुशीत राहत नाही आणि ते ऐकायलाही कोणी उरण्याची शक्यता नसते, त्यामुळे उपाय सुचवण्याचा गंभीरपणा/कडवटपणा कोणी घेऊ पाहत नाही. शेवटी जे केल्याने आनंद होईल ते माणसे करणार हा निसर्ग आहे.
प्रस्तुत चर्चाविषय हा अशा मराठीवर किंवा मराठी असे होण्यापासून वाचवण्यावर उपाय काय, असा आहेसे वाटते. कोणाला काही उपाय सुचत असेल तर तो वाचायला आवडेल."
-संपूर्ण सहमत