यावर उपाय अनेक सुचवले जातीलही. पण माझ्या मतें प्रत्येकाने शक्य होईल तितके मराठी शब्द वापरणे हा एक साधा सोपा उपाय होऊ शकतो. गुड मॉर्निंग ऐवजी शुभप्रभात म्हणणे कांही अवघड नाही. मी स्व:ता असें अनेक शब्द कटाक्षानें वापरतो. माझ्या घराला बैठकीची खोली, स्वयंपाकघर (चालू शब्द स्वैपाक घर) आणि झोपायची खोली आहे. घराला एक पुढचे दार आहे, त्याला अंगचे-कुलुप (लॅच)  आणि मागे एक सज्जाही (गॅलरी) आहे. साबण, साबणाची डबी, पुस्तकांचे फडताळ, पैशाचे पाकीट अथवा बटवा, दुधाचे पिशवी, न्याहारी किंवा नाश्ता, असें अनेक शब्द आपण वापरण्याची संवय करून घेतली तरी मराठीची आंग्लजाळता कमी करता येईल. त्याही पेक्षा महत्त्वाचे असें की पुढील पिढीलाही अनुकरणानें अशीच संवय लागेल. ( इथें मी आत्मस्तुतीचा दोष पत्करून माझें स्व:ताचें उदाहरण दिलें आहें. क्षमस्व)