कधीकधी तथाकथित हुशार वाचकांना
(म्हणजे ज्यांना 'उच्च'पणे गुलजार, ग्रेस 'जीवघेणा' आवडत असतो) शब्दमधुर
धूसरता आवडते असेही आढळून येतो.
रावसाहेब, जे तुमच्यासारखे डोळसपणे गुलजार किंवा ग्रेस वाचतात त्यांच्यासाठी वरील वाक्य नाही. पण अनेक वाचकांना शब्दमधुर धूसरतेच्या गांज्याचे व्यसन लागलेले असते. हे वाक्य या दोन्ही कविवर्यांसाठी नाही तर अशा वाचकांसाठी आहे.
ज्यांत मुळातच दम नसतो, त्या पोकळ आणि आवखोर साहित्याला ललितलुलित शब्दांचा, विशेषणांचा, कॢप्त्यांचा भुसा लागतो असे माझे मत.
हे
गुलजार यांच्या काव्याला लागू होत नाही.
माझ्या मते पूर्णपणे कुणालाच लागू किंवा गैरलागू होत नाही. गुलजार मोठा कवी आहे. पण तुम्ही म्हणता तसे
'पत्थर की हवेली को, शीशोंके
घरोंदोंमें, तिनकोंके नशेमनतक, इस मोड पे आते है' हे अतिव कृत्रीम आणि
उबवलेले
अगदी. मलाही ते सहजावस्थेतले काव्य वाटत नाही. दमहीन आहे की नाही हा भाग वेगळा. अशा क्लृप्त्यांमुळेच कदाचित क़ैफ़ींनी गुलज़ारला कवी मानताना फार त्रास व्हायचा.:) क़ैफ़ी काय साधे लिहिणारा (साधे म्हणजे सोपे नाही) कवी, 'कोई ये कैसे बताये के वो तनहा क्यूं है' सारखे.
"वो यार है जो खुशबू की तरहा, जिसकी जुबाँ उर्दू की तरहा, मेरी शामरात,
मेरी कायनात, वो यार मेरा छैंया छैंया' हे अगम्य वाटू शकेल, पण तरीही हे
उत्तम काव्य आहे.
काव्य छान आहे. चांगल्या कवीचे पाडकाम(पाडलेल्या कविता)ही चांगले असते. पण कवी असे का लिहितात? कारण त्यांची ती ओळख झाली असते. लोकांचीही तीच अपेक्षा असते.
कोई रिश्ता नहीं रहा फिर भी
एक तसवीर लाज़मीसी है
सारख्या ओळी ग़ुलज़ारने दिलेल्या आहेत. पण 'गिला, गिला पानी' सारख्या ओळी त्याच्याच.
अर्थात बऱ्याच कवींनी / लेखकांनी या गोष्टीचा वापर आपले कल्पनादारिद्र्य लपवण्यासाठी केला, हा भाग वेगळा.
अगदी नेमके. कवींनी कल्पनादारिद्र्य लपविले. वाचकांना तो प्रकार आवडला. आणि मागणी-पुरवठ्याच्या चक्राला गती मिळाली. वाचकांनी हा प्रकार नुसता खपवून घेतला नाही तर त्याला खतपाणी दिले. कॅसेट लावून 'कल्ला रे', 'उच्च रे', 'जीव घेतो रे' असे म्हणत, अश्रू ढाळत.