तसाहीतर मराठीचा बट्ट्याबोळ होतच आहे,मराठी माणसे स्वतःच मराठी विकत घेत नाहीत हे रडगाणे कितीकाळ गाणार; तेव्हा मराठी स्वतःच विक्रीस काढा, कमीत कमी विकत घेतलेल्यांनी मोडीत काढले तर दु:खाचा आणि ऊरफोडी भावनांचा उद्रेक (तमाशा?) तरी थांबेल.
मराठी कशी विकावी
- आमेरीका देशात स्पोकन मराठीचे क्लासेस काढावेत (मनोगतींकरता सर्वात चांगला ऊद्योग) मराठी प्रत्यय लावून इंग्रजी शब्द रोमन लिपीत विकायचे म्हणजे गोऱ्या ग्राहकांना मराठी सोपी होईल . गोऱ्यांच्या नादाने मराठी पोरेही थोडी मराठी शिकतील.
- भारतातील मुंबई,नागपूर,औरंगाबाद ईत्यादी अमराठी प्रदेशात हिंदी शब्दांना मराठी प्रत्यय लावून सुलभ मराठीचे क्लासेस काढावेत.
- हिंदी सिनेमाच्या रिमिक्स गाण्यात शक्य तेवढे मराठी शब्द टाकावेत, जसे लवंगी , फटाकडी
- मराठीत शिकवणाऱ्या शिक्षकांना पगार देऊ नयेत.
- मराठीत अनुवाद करणाऱ्यांना फटक्यांची शिक्षा द्यावी
तुम्हालाही असे काही उपाय सुचले तर कळवा
ऌऋ