कोणी दारू सोडतात, अनेक जण अनेक वेळा (?) सिगरेट सोडतात तसाच माझ्या एका नातेवाइकाने एकदा चहा सोडला. त्यानंतर तीन चार महिन्यांनी एकदा तो आमच्या घरी आला असतांना, " आता तुम्ही काय घेणार?"  असे विचारता म्हणाला, "अहो काय सांगू? ज्याच्या ज्याच्या घरी मी गेलो त्या प्रत्येकाला मी कांही तरी घ्यायलाच पाहिजे असे वाटायचे. त्यामुळे कोणी कॉफी आणून देतो, कोणी ओव्हलटाइन, तर कोणी अमृतकोकम नाही तर वाळ्याचे सरबत! ही न आवडणारी पेये पिऊन माझा जीव हैराण झाला नुसता. शिवाय त्यांना सुद्धा ती करतांना त्रासच होतो आहे असे दिसून यायचे. म्हणून मी म्हंटलं त्यापेक्षा आपला अमृत तुल्य चहाच बरा."